*असे घडले पुणे...!!*
*****************

*सन 754* : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'.

*सन 993* : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव  पडले.

*सन 1600* : मूळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते.

*सन 1637* : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली -
सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.

*सन 1656* : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली
होते.

*सन 1663* : मंगळवार पेठ वसली.

*सन 1703* : बुधवार पेठ वसली.

*सन 1714* : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.

*सन 1721* : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुनर्बांधणी सुरू.

*सन 1730* : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.

*सन 1734* : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ
वसवली.

*सन 1749* : पर्वतीवरील देवालय बांधले.

*सन 1750* : वेताळ पेठ वसवली, कात्रज तलाव व
वेशी बांधण्यात आल्या.

*सन 1755* : नागेश पेठ वसवली. पर्वती तळे बांधले.

*सन 1756* : गणेश व नारायण पेठा वसवल्या.

*सन 1761* : लकडी पूल बांधण्यात आला.

*सन 1769* : सदाशिव व भवानी पेठा वसवल्या गेल्या.

*सन 1774* : नाना, रास्ता व घोरपडे पेठा वसवल्या.

*सन 1790* : फडणवीस वेस उभारण्यात आली.

*सन 1818* : इंग्रजी अंमल सुरू. खडकी कटक स्थापना.

*सन 1856* : पुणे-मुंबई लोहमार्ग सुरू झाला.

*सन 1857* : पुणे नगरपालिकेची स्थापना.

*सन 1869* : सर डेव्हिड ससून रुग्णालय कार्यान्वित.

*सन 1875* : संगम (वेलस्ली) पूल वाहतुकीस खुला.

*सन 1880* : खडकवासला धरण बांधून पूर्ण.

*सन 1881 ते 1891*: मुठा उजवा कालवा खोदण्यात
आला.

*सन 1884* : डेक्कन कॉलेजची स्थापना.

*सन 1885* : फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना.

*सन 1886* : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला.

*सन 1915* : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले.

*सन 1916* : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.

*सन 1915 ते 1925* : लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.

*सन 1919* : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.

*सन 1921* : पुण्याला वीजपुरवठा सुरू. नव्या पुलाचे
बांधकाम.

*सन 1941* : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्टतर्फे नागरी बससेवा सुरू.

*सन 1950* : पुणे महानगरपालिकेची स्थापना. पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू.

*सन 1952* : पुणे विद्यापीठाची स्थापना.

*सन 1953* : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू.

*सन 1961* : पानशेत धरण फुटले.

*सन 1973* : सिंहगडावर टी.व्ही. टॉवर सुरू झाला. पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.

🥦🥦💐🥦🥦💐🥦🥦

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*आपल्या देशाची आणि शहरांची मूळ नावे काय होती हे तुम्हाला माहीत आहे का?

भारतातील व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य :

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या मेसेजना अ‍ॅडमिन जबाबदार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल