भारतातील व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य :

भारतातील व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य :-

भारतातील व्हाईसरॉय :-भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व 1857 ते 1947 पर्यंत 20 गव्हर्नर जनरल झाले, त्यामध्ये भारतातील पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग तर शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन होते.

भारतातील व्हाईसरॉय व त्यांचे कार्य :-

लॉर्ड कॅनिंग: ( 1857-1862 )
- ( 1756 -1758 )
दरम्यान गव्हर्नर जनरल.
-
भारतातील पहिला व्हाईसरॉय. ( 1858 ते 1862 )
- 1857
चा उठाव मोडून काढला.
-
खालसा धोरण रद्द केले.
- ( 1856-
1857 )
आय.सी.एस. परीक्षा भारतात घेण्यास सुरुवात केली.
-1857
मध्ये मुंबई, मद्रास,कोलकाता या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली
- 1860
मध्ये आग्रा व लोहार येथे दरबार भरवून संस्थानिकांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली.
- 1836
मध्ये लॉर्ड मेकॉले ने तयार केलेल्या 'इंडियन पिनल कोड'ला 1860 मध्ये कनिंगने मान्यता दिली.
- 1861
च्या 'इंडियन हायकोर्ट ऍक्ट' नुसार मुंबई, मद्रास,कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली.
- 1861
चा कौन्सिल ऍक्ट संमत केला.
-
कॅनिंगने कोलकाता-अहमदाबाद लोहमार्ग 1861 मध्ये सुरु केला.
-
कॅनिंगच्या कार्यकाळात भारतीयांना 'सर' ही पदवी देण्यास सुरुवात केली.

लॉर्ड एल्गिन पहिला: ( 1862-1863 )
-
लॉर्ड एल्गिन हा सहिष्णु धोरणाचा पुरस्कर्ता होता.
हिमालय प्रदेशात धर्मशाळा येथे एल्गिनचा मृत्यू झाला.

सर जॉन लॉरेन्स : ( 1864-1869 )
-
शेतकऱ्यांचा हितासाठी पंजाब आणि अवध येथे 'टेनन्सी ऍक्ट' पास केले.
- 1868
मध्ये फॅमिन कमिशन (दुष्काळ आयोग) ची स्थापना केली.
-
जलसिंचन खाते निर्माण करून त्यावर रिचर्ड स्ट्रॅची या तज्ञाची नियुक्ती केली.
-
सिमला येथे उपराजधानीचे ठिकाण निर्माण केले.

लॉर्ड मेयो : ( 1869-1872 )
-
आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक .
- 14
डिसेंबर 1870 रोजी आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले.
- 1871
मध्ये भारताची पहिली जनगणना केली.
-
वहाबी चळवळ, कुका चळवळ मेयोच्या कार्यकाळात क्रियाशील झाल्या.

कुका चळवळ :-
-
कुका चळवळ पंजाब मध्ये रामसिंह कुका यांनी चालविले.
-
ब्रिटिशांच्या दडपशाहीची चीड येऊन रामसिंह कुकांनी लष्करी नोकरी सोडून दिली आणि एका धार्मिक संप्रदायाची स्थापना केली.
-
ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कार्य करायचे असल्याने रामसिंह कुकांची 'कुका चळवळ' अतिशय गुप्तपणे सुरु होते.
-
रामसिंह कुकांच्या अनुयायांना मृत्यूदंड देण्यात आला आणि रामसिंह कुकांना ब्राम्हदेशात हद्दपार करण्यात आले.
-
देशाचे संख्यांकिय सर्वेक्षण करून कृषी खाते सुरु केले.

लॉर्ड नार्थब्रुक : ( 1872-1876 )
- 1875
मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या राजकुमाराची भारतभेट झाली होती.

लॉर्ड लिटन : ( 1876-1880 )
-
लिटनने 1876-1878 च्या दुष्काळावर उपाय सुचविण्यासाठी रिचर्ड स्ट्रॅची या तज्ञाची नियुक्ती केली होती.
- 1
जानेवारी 1877 रोजी दिल्ली दरबारात राणी व्हिकटोरियास 'भारताची सम्राज्ञी' ( कैसर--हिंद ) ही पदवी दिली.
-
मार्च 1878 ला व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट ( देशी वृत्तपत्र कायदा ) समंत केला.
- 1878
च्या शस्त्रबंदी कायद्यानुसार विना परवानगी शस्त्रे बाळण्यास भारतीयांवर बंदी घातली.
- 1879
ला 'स्ट्रॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट' पास करून आय. सी. एस. परीक्षेची कमाल वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षे केली.
-
मिठाचा व्यापारावर जाचक कर लादले.

लॉर्ड रिपन : (1880-1884 )
-
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक.
-
मानवतावादी दृष्टिकोन व भारताबद्दलची आस्था यामुळे रिपनला भारतात लोकप्रियता लाभली.
-
रिपनने 1881 मध्ये म्हैसूर, बडोदा या राज्यांची पूर्नस्थापना केली.
- 1881
चा फॅक्टरी ऍक्ट पास करून 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घातली.
- 19
जानेवारी 1882 रोजी रिपनने 'व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट' रद्द केला.
- 1882
ला विल्यम हंटर कमिशीन नेमले.
- 18
मे 1872 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पास केला.
-
रिपनच्या कारकीर्दीत राव व रावबहादूर अशा पदव्या देण्यास सुरुवात झाली.
- 2
फेब्रुवारी 1883 रोजी इल्बर्ट विधेयक मंजूर करून भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार मिळाला.
-
रमेशचंद्र मित्तर यांची कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केली आणि मुख्य न्यायाधिशपदी नियुक्ती होणारे ते पहिले भारतीय न्यायाधिश होते.
-
आय. सी. एस. परीक्षेची कमाल वयोमर्यादा 19 वरून पुन्हा 21 वर्षे केली.

लॉर्ड डफरिन : ( 1884-1888 )
- 28
डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली.
- 1886
मध्ये चार्ल्स अचिसन यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली.
- 1887
चा 'पंजाब कुळ कायदापास केला.
- 16
फेब्रुवारी 1887 रोजी व्हिकटोरिया राणीच्या राज्य रोहण्याचा 50 व्या वर्धापणदिनाचे आयोजन केले.
-
लॉर्ड डफरिन यांच्या पत्नीने भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी 'लेडी डफरिन फंड' स्थापन केला.

लॉर्ड लान्स डाऊन : ( 1888-1894 )
- 1892
चा कॉन्सिल ऍक्ट पास केला.
समतीवय कायद्यानुसार 12 वर्षाखालील मुलींचे विवाह बेकायदेशीर ठरविण्यात आले.
-
भारत-अफगानिस्तान दरम्यानची ड्यूरँड सीमारेषा आखली.
-
लिटन ने सुरु केलेली स्टॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट लॉन्स डॉऊनने बंद केली.

लॉर्ड एल्गिन दुसरा :
( 1896-1897 )
या काळात महाराष्ट्रात प्लेगची साथ पसरली.
- 1899
मध्ये बिहारमध्ये संथाळ्यांनी उठाव केला.

लॉर्ड कर्झन : ( 1899-1905 )
-
कर्झनच्या कारकीर्दीत भारतात सर्वाधिक रेल्वेमार्गाची निर्मिती झाली.
-
कर्झनने 1899 ला भारतीय चलन कायदा पास केला.
- 1900
मध्ये कर्झनने कोलकत्ता महापालिका विधेयक मंजूर करून स्थानिक स्वराज्य संस्थेवर नियंत्रणे लादली.
- 1900
मध्ये लॉर्ड मॅक्डोनॉल्डच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला.
- 1901
मध्ये सिमला येथे शिक्षण परिषद भरवली.
- 1901
ला रॉयल नेव्हीची स्थापना केली.
- 1901
मध्ये वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती केली.
- 1901
मध्ये संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षणासाठी इंपिरिअल कॅडेट कोअर ची स्थापना केली.
- 1902
मध्ये अंण्ड्यु फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस सेवेतील दोष शोधण्यासाठी समिती नेमली.
- 1904
मध्ये विद्यापिठ कायदा पास करून उच्चशिक्षण पद्धतीवर निर्बंध लादले.
-
या विद्यापीठ कायद्याशी संबंधित 'रॅले आयोग' होता.
- 1904
मध्ये भारतातील पहिला सहकारी पतपेढीविषयक कायदा समंत केला.
- 1904
मध्ये भारतातील प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदा पास केला.
-
बंगालची अन्यायी फाळणी 1905 ला कर्झननेच केली.
-
कर्झनने लष्करी अधिकाऱ्यासाठी क्वेट्टा येथे प्रशिक्षण केंद्र उभारले.
-
लष्करी सेनापती किचनेरशी वाद व त्यावरून कर्झनने राजीनामा दिला होता.
-
ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने असे लिहिले की "भारत हा आपल्या साम्राज्याचा केंद्रबिंदू आहे------ आपल्या वसाहतील दुसरी एखादी वसाहत गमावली तर आपले साम्राज्य चालू राहिल; परंतु भारत गमावला तर मात्र आपल्या साम्राज्याचा सूर्य मावळलेला असेल" .
-
राष्ट्रीय सभेचा झपाट्याने ऱ्हास होत असून तिला शांतपणे गाडून टाकणे ही माझी सर्वात मोठी महत्वाकांक्षा आहे असे लॉर्ड कर्झनने म्हटले.

लॉर्ड मिंटो ( 1906-1910 )
- 1906
मुस्लिम लीगची स्थापना
- 1909
मोर्ले मिंटो सुधारणा कायदा व यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.

लॉर्ड होर्डिंग्ज दुसरा ( 1910-1916 )
- 1911
भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलविली.
- 1911
ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.

लॉर्ड चेम्सफोर्ड ( 1916-1921 )
- 1919
रौलट कायदा समंत केला.
- 13
एप्रिल 1919 रौलट कायद्याच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर जनरल डायरने गोळीबार केला.
- 1919
माँटेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा समंत केला.
- 1920
गांधीजींची असहकार चळवळ.

लॉर्ड रिडींग ( 1921-1926 )
- 5
फेब्रुवारी 1922 चौरी-चोरा हत्याकांडामुळे गांधीजींची असहकार चळवळ स्थगित झाली.
-
प्रिन्स ऑफ वेल्सची भारत भेट.
- 1923
स्वराज्य पक्षाची स्थापना.
- 1925
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे डॉ. हेगडेवार यांनी केली.

लॉर्ड आयर्विन ( 1926-1931 )
- 1927
सायमन कमिशनची स्थापना.
- 1928
सायमन कमिशनच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यात लाहोर येथे लाला लजपतराय यांच्या लाठीहल्ल्यात मृत्यू.
-
ऑगस्ट 1928 'नेहरू रिपोर्ट' पंडित मोतीलाल नेहरूनी मांडला.
- 1929
संपूर्ण स्वराज्याची मागणी.
- 1930
लंडन येथे पहिली गोलमेज परिषद.
- 5
मार्च 1931 गांधी आयर्विन करार.

लॉर्ड विलिंग्डन ( 1931-1936 )
- 1931
ची दुसरी व 1932 ची तिसरी गोलमेज परिषद लंडन येथे घेण्यात आली.

- 16 ऑगस्ट 1932 रॅम्से मॅक्डोनाल्डचा जातीय निवडा; त्यानुसार अस्पृश्यांसाठी वेगळ्या मतदार संघांची घोषणा.
- 1932
महात्मा गांधींचे येरवडा कारागृहात उपोषण सुरू.
- 25
सप्टेंबर 1932 गांधी-आंबेडकर यांच्यात पुणे करार / ऐक्य करार झाला.
- 1935
चा भारत सरकार विषयक कायदा समंत केला.
- 1935
ब्रम्हदेश भारतापासून वेगळा.

लॉर्ड लिनलिथगो ( 1936-1944 )
- 1937
भारतात प्रांतिक निवडणूका, 8 प्रांतात काँग्रेसची सरकारे.
- 1
सप्टेंबर 1939 दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात.
-
ऑक्टोबर 1939 प्रांतिक मंत्रिमंडळाचे राजीनामे.
- 8
ऑगस्ट 1942 'चले जाव' ठराव समंत.

लॉर्ड वेव्हेल ( 1944-1947 )
- 1945
सिमला परिषदेत वेव्हेल योजना मांडली. भारतीयांनी ती नाकारली.
- 1945
इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेवर; लॉर्ड अटली हे इंग्लडचे पंतप्रधान बनले.
- 1946
त्रिमंत्री योजना ( कॅबिनेट मिशन )
2
सप्टेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकारची स्थापना.
- 9
डिसबेंर 1946 घटना परिषदेचे पहिले अधिवेशन दिल्लीत सूरु.

लॉर्ड माऊंटबॅटन ( 1947 स्वातंत्र्यपूर्व कारकीर्द )
- 3
जून 1947 माऊंटबॅटन योजना घोषित; त्यानुसार भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली.
- 18
जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा समंत.
- 15
ऑगस्ट 1947 सुमारे दिडशे वर्षांच्या गुलामीच्या  शृंखलांतून भारत स्वतंत्र झाला.
-
लॉर्ड माऊंटबॅटन हे ब्रिटिशकालीन भारताचे शेवटचे व्हाईसरॉय तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरले.


स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल

( 1947-1950 )

1) लॉर्ड माऊंटबॅटन :
कार्यकाल : 15 ऑगस्ट 1947 ते 21 जून 1948
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर  जनरल.
-
भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय.
-
माऊंटबॅटन योजनेमुळे ( 3 जून 1947 ) भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे उदयास आली.


2) चक्रवर्ती राजगोपालाची ( सी. राजाजी )
-
कार्यकाल : 21 जून 1948 ते 26 जानेवारी 1950
-
स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल.
-
स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय जनरल.
- '
राजाजी योजना' मुस्लिम लीगने फेटाळली.

THANK YOU

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*आपल्या देशाची आणि शहरांची मूळ नावे काय होती हे तुम्हाला माहीत आहे का?

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या मेसेजना अ‍ॅडमिन जबाबदार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल