जेजूरी 

जेजुरी हे गांव जेजूरी गड म्हणून ओळखले जाते व महाराष्ट्राच्या पुरंदर तालुक्यात   पुणे  जिल्यात आहे. महाराष्ट्राचे  तीन  कुलदैवत आहे  कोल्हापूरचे  ज्योतीबा,  पंढरीचे  विठोबा तर जेजूरीचे  खंडोबा. खंडोबा हे  धनगर, आगरी, कोळी यांचे कुलदैवत आहे. 

   खंडेरायाचे देऊळ अतिशय सुंदर असे दगडामध्ये बांधलेले व सुंदर असे  नक्षीकाम केलेले  आहे. एकूण  ३८५ पाय-या ह्या गडाला आहेत.  या  पाय-यांना  नऊ लाख दगडे  बांधायला लागल्याने  नऊ लाख  पाय-यांची जेजूरी गड म्हणून  सुध्दा ओळखले  जाते .  रविवार हा खंडेरायांचा दिवस आहे.  पाय-यांनी  मुख्य  मंदिरात प्रवेश करतांना दोन देवळ्या लागतात.  येळकोट येळकोट जय मल्हार,  सदानंदाचा विजय असो  म्हणून जयघोष केला  जातो.  हळदीची व खोब-याचा  भंडारा  ऊडवला  जातो.  गडाला यशवंत यांनी आपल्या प्राणाची आहुती देवून वाचविले होते. ..म्हणून त्यांना  गडाचा रक्षक म्हणून म्हटले जाते.   जेजूरी गडावरूनं जेजूरी गावाचे  विहंगम  दृश्य दिसते.  गडावरच  खंडेरायाच्या  अर्धांगीनी   म्हाळसादेवी  चे  देऊळ आहे.
नवदाम्पत्य येथे आवर्जून दर्शनाला येतात. खंडोबाला  शंकराचा अवतार सुध्दा  म्हटले जाते. सतराव्या शतकात   राघो  मंबाजी यांनी सभामंडपाचे काम केले होते.  पाच  दगडी  कमानी  पार  करत आपण  मंदीर   गडावर   पोहोचतो.  संबंळ,  जागरण  गोंधळ  ही  महाराष्ट्राची  लोककला आहे.  गोंधळात  खंडोबाचा  नावाचा  जयघोष  केल्या  जातो. खंडोबा यांच्या  पहिल्या  अर्धांगीनीचे  नाव  म्हाळसादेवी आहे  तर  दुस-या  अर्धांगीनीचे  नाव  बानूबाई आहे.  खंडोबाला  मल्हारी  मार्त॔ड असे  सुध्दा म्हटले जाते.  मृत्यूलोकीचे दुसरे  कैलास शिखर म्हणून जेजूरी गढ ओळखल्या  जातो.  पिवळाधम्म  हळदिचा  भंडारा  ऊधळल्याने  जेजूरीला  सोन्याची  जेजुरी  सुध्दा  म्हटले जाते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*आपल्या देशाची आणि शहरांची मूळ नावे काय होती हे तुम्हाला माहीत आहे का?

भारतातील व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य :

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या मेसेजना अ‍ॅडमिन जबाबदार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल