व्हॉट्स अॅप ग्रुपच्या मेसेजना अॅडमिन जबाबदार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल संबंधित मेसेजमागे ग्रुपचा सामाईक हेतू नसेल तर अॅडमिनला दोष देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती यांनी हा निकाल दिला आहे. (Admin is not responsible for WhatsApp group messages; Mumbai High Court verdict) केंद्र सरकारने सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या वादग्रस्त आणि भडकावू मेसेजला चाप लावण्यासाठी नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानंतरही व्हायरल मेजेसचे प्रमाण तितकेसे कमी झालेले नाही. अजूनही व्हॉट्स अॅप ग्रुपवर मोठ्या प्रमाणावर मेसेज व्हायरल होतात. अशा मेसेजेसमुळे व्हॉट्स अॅप ग्रुपची डोकेदुखी वाढते. याच पार्श्वभूमीवर ग्रुप अॅडमिनला मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. व्हॉट्स अॅपवर कुणीही काहीही पोस्ट केले वा वादग्रस्त मेसेज टाकले तर त्या मेसेजप्रकरणी व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला जबाबदार धरता येणार...