पोस्ट्स

भारतातील व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य :

भारतातील व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य : - भारतातील व्हाईसरॉय :- भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व 1857 ते 1947 पर्यंत 20 गव्हर्नर जनरल झाले , त्यामध्ये भारतातील पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग तर शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन होते . भारतातील व्हाईसरॉय व त्यांचे कार्य :- ◆ लॉर्ड कॅनिंग : ( 1857-1862 ) - ( 1756 -1758 ) दरम्यान गव्हर्नर जनरल . - भारतातील पहिला व्हाईसरॉय . ( 1858 ते 1862 ) - 1857 चा उठाव मोडून काढला . - खालसा धोरण रद्द केले . - ( 1856- 1857 ) आय . सी . एस . परीक्षा भारतात घेण्यास सुरुवात केली . -1857 मध्ये मुंबई , मद्रास , कोलकाता या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली - 1860 मध्ये आग्रा व लोहार येथे दरबार भरवून संस्थानिकांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली . - 1836 मध्ये लॉर्ड मेकॉले ने तयार केलेल्या ' इंडियन पिनल कोड ' ला 1860 मध्ये कनिंगने मान्यता दिली . - 1861 च्या ' इंडियन हायकोर्ट ऍक्ट ' नुसार मुंबई , मद्रास , कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली . - 1861 चा कौन्सिल ऍक्ट संमत केला